Pages

6 May 2011

नक्षत्रवन ...

प्रत्येक चांगल्या गोष्टीला अंत असतो असे म्हणतात. खरंय ते, नाहीतर माझी इतकी मोठी सुट्टी संपली असती का.. अखेर मी पुन्हा कामावर रुजू झालोच. गेल्या ३ महिन्यात (साडेतीन.. उगाच खोटे कशाला बोला) मस्तपैकी आराम झाला. तसे थोडे फिरणेही झालेच. मार्च महिन्यात कोकणात थोडी भटकंती झाली तेंव्हा गुहागर आणि दापोलीला गेलो होतो. दापोलीला ते कृषी विद्यापीठ आहे ना तिथे. तिथे त्यांच्या वनशास्त्र महाविद्यालयाचे नक्षत्रवृक्षांचे वन पहिले. मस्त आहे. बरीच माहिती नव्याने मिळाली.

मला तर ठावूकच नव्हते की प्रत्येक नक्षत्राचा एक स्वामी वृक्ष असतो. प्रत्येकाने स्वतःच्या राशी नक्षत्राचे झाड लावावे, त्याचे पूजन करावे आणि सानिध्यात राहावे असे म्हटले जाते. तिथे दिलेल्या माहितीप्रमाणे २७ नक्षत्रांचे स्वामी वृक्ष खालीलप्रमाणे...

मृगशीर्ष -  खैर
पुनर्वसू - वेळू उर्फ बांबू
आद्रा - अर्जुन
रोहिणी - जांभूळ
आश्लेषा - नागचाफा
पुष्य - पिंपळ
पूर्वा - पळस
मघा - वड
हस्त - जाई
उत्तरा - पायरी
चित्र - बेल
अनुराधा - केवडा
स्वाती - अर्जुन
मूळ - साल
जेष्ठा - सावर
पुर्वाशाढा - वेत
श्रावण - रुई
धनिष्ठा - शमी
शततारका - कदंब
पूर्व भाद्रपदा - आंबा  
उत्तर भाद्रपदा - कडूनिंब
रेवती - मोहं
अश्विनी - कुचला
भरणी - आवळा
कृतिका - उंबर
पूर्व फाल्गुनी - पळस
विशाखा - नागकेशर

ही सर्व झाडे विद्यापीठात विक्रीसाठी पूर्णवेळ उपलब्ध असतात. तर मग कधी वृक्षारोपण करताय आपल्या नक्षत्राच्या स्वामीवृक्षाचे??? वाढदिवसाला गिफ्ट काय देऊ असा विचार येणाऱ्या लोकांना एक चांगला पर्याय आहे... नाही का!!! तेवढंच वृक्षारोपणाचे सत्कर्म... :)

16 comments:

  1. सहीये.. हे माहित नव्हतं ! आता माझ्या राशीचं नक्षत्र शोधावं लागेल आधी..

    गुहागरच्या समुद्रावर गेलास की नाही? आणि व्याडेश्वर दर्शन? मुसळ्यांची मिसळ?? अजून एक पोस्ट येउदे.. :)

    ReplyDelete
  2. अरे ते आधी झालाय... ह्यावेळी गुहागर म्हणजे अगदी टच आणि गो असे झाले.. मेन वेळास, मुरुड, दापोली वगैरे केले...

    ReplyDelete
  3. मलापण हे माहीत नव्हतं. धन्यवाद.

    ReplyDelete
  4. हे अस् आपल्या इथे मुंबई नेचर पार्क (धारावी) मध्ये देखील आहे...

    ReplyDelete
  5. Nakshatra vana barobar tyancha dishan vishayi lihayla hava hota na. Anyways good to see diff topic.

    ReplyDelete
  6. माझं रोहीणी... :)

    ReplyDelete
  7. सहीये.. हे माहित नव्हतं ! आता माझ्या राशीचं नक्षत्र शोधावं लागेल आधी... +1

    पत्रिका पहातो. माझं नक्षत्र पूर्व भाद्रपदा असू दे. आंब्याच्या सहवासात राहायला मिळेल ;-)

    ReplyDelete
  8. सुहास... अरे मी मुंबईत राहून देखील अजून त्या माहीम नेचर पार्कला गेलेलो नाहीये... :(
    शमी... ऐकते आहेस ना... ;)

    ReplyDelete
  9. लिहिले असते गं... पण त्याची माहिती म्हणजे पुन्हा ते वास्तुरंगचे सर्व लेख वाचून टिपणे काढावी लागली असती... :)

    ReplyDelete
  10. आंब्याच्या सहवासात राहायला मिळेल??? जल्ला तू आयुष्भर त्याच सह'वासात' असतोस की... तू कशाला हवा तो नक्षत्रा... :P

    ReplyDelete
  11. छान माहिती ...
    (आमचं विद्यापीठ फार सुधारलेल दिसतंय ..)

    ReplyDelete
  12. हो.. पण अजून सुधारता येईल... :)

    ReplyDelete
  13. ते आहेच... पण हेही नसे थोडके ..
    (अनुभवाचे बोल )

    ReplyDelete
  14. रोहणा नवी आहे रे माहिती... असं काही असतं अजिबात कल्पना नव्हती... आभार रे!!

    @ हेरंबा तुझ्या राशीचं नक्षत्र सापडलं की कळव रे मलाही :)

    ReplyDelete
  15. तन्वी.. अस बरंच काही असते... :) आपण पुन्हा जुनी पुस्तके वाचायला हवीत असे वाटायला लागलंय... :) मी काय म्हणतो.. ह्यावेळी मेळाव्याला प्रत्येकाला त्याच्या-तिच्या नक्षत्राचे झाडच देऊया... :) कसे?

    ReplyDelete
  16. सेनापती...माहितीबद्दल खुप खुप धन्यवाद :)

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद... आपली टिप्पणी लवकरच प्रकाशित केली जाईल...