Pages

15 Jan 2011

मी घडलो... बिघडलो...

बऱ्याचदा निवांत बसलेलो असताना अचानक कुठूनशी एखादी आठवण येते आणि मन सैरभैर करून जाते. हो नं.. आठवणी आल्या की त्या काय सहजासहजी थोडीच थांबतात. एकामागून एक अश्या येतच जातात आणि मग निर्माण करून ठेवतात मनावर एक ठसा. पुन्हा एक नवीन आठवण. आयुष्यात प्रत्येक क्षणी आपल्यासमोर आलेल्या प्रसंगांच्या आठवणींची एक-एक पानं आपण जपून ठेवतो आणि मग ते एक-एक पान हळुवारपणे आपण उलगडू लागतो. लहानपणापासून आपण जिथे वाढलो, लहानाचे मोठे झालो, आपले आई-वडील, आपले पहिले राहते घर, आपली शाळा, लहानपणीचे मित्र - मैत्रिणी, प्रेम, आयुष्यात आलेला तो प्रत्येक क्षण आपण भरभरून जगलेलो आहोत हे आता आपण मोठे झाल्यावर हळूहळू लक्ष्यात येते. मग आपण आठवणी जागवू लागलो. लहानपणी भरभर मोठे व्हायचे असते आणि मोठे झालो की 'लहानपण देगा देवा' म्हणत आपण दिवस काढतो...

अश्याच काही आठवणी मी आता ह्या ब्लॉगद्वारे तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. ह्यात सर्व काही असेल... माझे लहानपणीचे धमाल किस्से असतील. कैच्याकै लिखाण असेल, आवरा लिखाण पण असेल, धमाल - मज्जा - मस्ती असे सर्व-सर्व असेल. सोबत माझी विविध विषयांवरील मते असतील जी मी आत्तापर्यंत मांडायचे टाळत आलोय. शुभेच्छा असतील, खादाडी असेल आणि विचारमंथन पण असेल.. माझ्या आयुष्यावर प्रभाव सोडून गेलेल्या, भावलेल्या व्यक्तींचे चित्रण असेल, एखादी कथा किंवा ललित आलेच तरी दचकू नका हा.. :)


ह्या सर्व अनुभवांमधून मी थोडा घडलोय... आणि थोडा बिघडलोय... शेवटी आयुष्य म्हणजे काय.. 'परिपूर्णतेकडे चालू अस
लेली एक वाटचाल'. हा ब्लॉग सुद्धा त्याचाच एक भाग असे समजून पुढे सरकतोय... मला खात्री आहे आजवर माझ्या इतिहास आणि भटकंती लिखाणाला जसा प्रतिसाद आपण दिलात तसाच प्रतिसाद आत्ता सुद्धा द्याल.


तुम्हा सर्वांवर लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा... 
 

शुभेच्छापत्र आलेल्या विरोपातून साभार..




 

12 comments:

  1. (पोस्ट) आली ती बेस्ट! (ऑल द बेस्ट :P)

    ReplyDelete
  2. खूप छान, रोहन
    परिपूर्णतेकडे नेणाऱ्या वाटेवर वाटचाल करण्या करता खूप शुभेच्छा आणि हो मकर संक्रातीच्या ही ... तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला..

    ReplyDelete
  3. अभिनंदन रोहणा.. हो जा शुरू.. ब्लॉग फॉलो करायचा पर्याय दिसत नाहीये

    ReplyDelete
  4. मनस्वी.. या ब्लॉगवर आणि ब्लॉगविश्वात स्वागत... माझा हा नवीन ब्लॉग कुठून सापडला तुला? :)

    ReplyDelete
  5. वा... २०१० मध्ये माझ्यामते जे खरे-खुरे ब्लॉग स्पर्धा विजेते आहेत.. अश्या दोघांच्याही कमेंट बघून आनंद झाला.. :)

    बाबा.. परत आला आहेस म्हणजे लिखाण तुफान ना.. :) मी सुट्टीवर जातोय पण तिथून वेळ काढून वाचीन नक्की... :)

    हेरंब.. हो रे.. :) लिहिता होतो आता अजून..:)
    अरे मला ब्लॉग फॉलो करायचा पर्याय टाकूच देत नाही आहे... :( हे बघ हे असे येतंय...

    "हे गॅझेट प्रायोगिक आहे आणि अद्याप सर्व ब्लॉग्जवर उपलब्ध नाही. लवकरच परत तपासा!"

    ReplyDelete
  6. अरे वा रोहणा... तूला आठवतं आपलं मागे या विषयावर बोलणं झालं होतं .. तू म्हणाला होतास तुझे सगळॆ ब्लॉग्स एकेका विषयावर आहेत, ललित लिहीले जात नाही...

    तर आता मी सुद्धा हेरंबसारखेच म्हणेन.. हो जा शुरू :) अनेक अनेक शुभेच्छा :)

    ReplyDelete
  7. अरे व्हा आता मस्त मस्त मेजवानी मिळत जाणार वाचायला !

    लिहिते रहो लिहिते रहो !(मानत मात्र खाते रहो येत होते ) ;-)

    ReplyDelete
  8. वाह आम्हाला नवीन नवीन मेजवानी मिळणार ... खूप छान. शुभेच्छा.
    प्लीज़ ते ब्लॉग फॉलो करायचा ऑप्षन टाक किवा फीडबर्नर तरी....
    लिहते रहो...

    ReplyDelete
  9. सही. बाल सेनापतींच्या मोहिमा लवकरच प्रकाशित होतील तर.
    शुभेच्छा.

    ReplyDelete
  10. आजच तुझं हे नवं बाळ बघितलं ... नव्या ब्लॉगला शुभेच्छा! इतिहास आणि भटकंतीसारखंच ललित पण वाचायला मिळेल आता तू लिहिलेलं. (मी खादाडीचा उल्लेख करत नाहीये याची नोंद घ्यावी ;)

    ReplyDelete
  11. Re to:
    मनस्वी.. या ब्लॉगवर आणि ब्लॉगविश्वात स्वागत... माझा हा नवीन ब्लॉग कुठून सापडला तुला? :)

    Tuzya etar blog varun, Rohan..
    ani Swagatabaddal dhanyawad... karatar tuze abhar.. tu ekada suchavale hotes blog var lihinyabaddal.. khup halu suruvat kartoy-shiktoy.. pan thodyach divsat.. Himalayachi bhatkanti anin samor....

    ReplyDelete
  12. Hi Rohan

    waiting for more posts on this blog - It would be interesting to follow this blog as well

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद... आपली टिप्पणी लवकरच प्रकाशित केली जाईल...