हा ब्लॉग सुरू करायचे अनेक महिने मनात असले तरी आत्ताच हा ब्लॉग सुरू करायचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी आकाने (आनंद काळे) सुरू केलेला एक बझ. सर्वांचे लहानपणीचे किस्से ऐकून अनेक दिवसांनी मनमोकळेपणाने पोट दुखेपर्यंत हसलो. तेंव्हाच ठरवले एक ब्लॉग सुरू करायचाच. त्यावर मी माझ्या शालेय जीवनातला एक छोटासा किस्सा टाकला होता तो इथे पुन्हा सविस्तरपणे मांडतोय.
साल १९९८... माझे दहावीचे वर्ष.. पहिल्या की दुसऱ्या चाचणी परीक्षेचे पेपर तपासून हातात पडलेले. त्यातला भूगोलाचा पेपर मी अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने पुन्हा पुन्हा तपासून बघत होतो. भूगोल माझा तसा आवडीचा विषय. लक्ष्यात आले की भूगोलाच्या शिक्षकांनी माझ्या एका बरोबर उत्तराला चूक देऊन गुण दिले नव्हते. भारताच्या नकाशामध्ये 'दिल्ली'चे भौगोलिक स्थान दाखवा असा तो प्रश्न होता. येत्या भूगोलाच्या तासाला शिक्षकांना ह्याबद्दल विचारायचे असे मी ठरवले होते. शिक्षक आल्यावर ज्यांचे गुण मोजण्यात किंवा देण्यात चूक झाली होती अशी २-३ मुले-मुली पुढे गेल्या. मी त्यात सर्वात शेवटी होतो. सर्वांचे समाधान झाल्यावर शिक्षकांनी मला विचारले,'चौधरी. काय झाले?'
मी : सर. मला एका प्रश्नाचे मार्क दिलेले नाहीत. हा बघा.
सर : कुठला रे.. बघू. हा? अरे चूक आहे ते.
मी : सर ते चूक कसे? दिल्ली तर इथेच आहे ना.
सर : नाही रे. दिल्ली बघ इथे आहे.. (सरांनी हरियाणामध्ये कुठेतरी बोट ठेवत सांगितले.)
मी : सर. दिल्लीतर हरियाणा आणि उत्तरप्रदेशच्याबरोबर मध्ये आहे. भूगोलाच्या पुस्तकात तसेच दाखवले आहे.
सर : कुठले पुस्तक वापरतोस तू? माझ्या पुस्तकात दिल्ली ही बघ इथे आहे. (सरांनी हरियाणामध्ये पुन्हा तिथे बोट ठेवत सांगितले)
(मला विनाकारण सरांशी वाद घालायचा नव्हती पण... शेवटी तत्वनिष्ठ माणूस मी... :D सरांना बोललोच...)
मी : सर.. तुमची दिल्ली दाखवा..
आता मात्र सर उडाले. वर्गात सर्वत्र हशा. काही मुले-मुली आपापसात कुजबुजू लागले.
सर : तुझ्या अश्या वर्तनाबद्दल मी तुला मुख्याध्यापकांकडे घेऊन जाऊ शकतो.
मी : हरकत नाही सर. पण बरोबर आहे त्याचे गुण मला मिळायलाच हवेत.
(हवंतर तिकडे जाऊन दिल्ली दाखवा - हे मनात)
पुढे काय... मला माझे गुण मिळाले.. तब्बल २ गुण... माझ्यासारख्या इतिहास आणि भूगोलात आवड असलेल्या विद्यार्थ्याने दिल्ली चुकावी??? ... असाच अजून एक दीड गुणाचा किस्सा अजून एका शिक्षकाबरोबर त्याच वर्षी झाला. तो पुन्हा कधीतरी..
आत्ता मात्र काम आटोपून उडायची तयारी करतोय... :) सुट्टीवर घरी पळतोय. लवकरच भेटू एखादा मजेशीर किस्सा घेऊन.. :)

हा हा... लैई भारी :)
ReplyDeleteमाझी दिल्लीपण वेगळीच होती .... ;-)
दिल्ला दाखवा म्हणल की पुन्हा तोच किस्सा आठवतो :) :)
ReplyDelete>>(हवंतर तिकडे जाऊन दिल्ली दाखवा - हे मनात)
ख्या...ख्या...ख्या...
सर.. तुमची दिल्ली दाखवा..
ReplyDeletemastch
देव काकांनी दिल्लीचा भन्नाट किस्सा सांगितल्यापासून दिल्ली म्हटलं की संतोष डोळ्यासमोर येतो ;-)
ReplyDeleteह्यावरून मला माझा गणिताचा किस्सा आठवला..
ReplyDelete